मराठी शाळा । Marathi Shala

ओटावात मराठी शाळा सुरु करणे हे सौ. कुंदा मुखेडकर यांचे स्वप्न होते. कुन्दाताईंनी Ottawa Carleton District School Board बरोबर संपर्क साधला आणि International Language Program च्या अंतर्गत २००० साली मराठी शाळेची यशस्वीरित्या सुरुवात झाली.ओटावा मराठी मंडळाने कायमच शाळेला प्रोत्साहन दिले आणि वेळोवेळी शाळेला आर्थिक मदतही केली. सौ. सुमेधा जोगळेकर या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या.

मराठी मुलांना त्यांची मातृभाषा आणि संस्कृती यांची ओळख व्हावी हा मराठी शाळा सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश होता. २००० साली सुरु झालेल्या या प्रकल्पात सौ. उज्ज्वला कुलकर्णी २००५ मध्ये प्रमुख शिक्षिका म्हणून सहभागी झाल्या आणि अतिशय उत्साहाने आणि जोमाने त्यांनी मराठी शाळा पुढे चालू ठेवली. सौ. सुमेधा जोगळेकर सहाय्यक शिक्षिका म्हणून सहयोग देतात.

मराठी शाळेत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक अश्या ३ श्रेणीत विद्यार्थ्यांना शिकवले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.शाळेत मराठी ऐकणे, वाचणे, बोलणे, शुद्धलेखन शिकवले जाते. मराठी संस्कृती, सण आणि उत्सव याची माहिती करून देणे ह्यावरही भर दिला जातो. पाठांतर, नृत्य, नाटक, गाणी, पारंपारीक पदार्थ ओळख, खेळ आणि मुलांना आवडतील असे प्रकल्प अश्या माध्यमातून मुलांना मराठी शिकवले जाते. शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन मुले आपली कला सादर करतात.

मराठी शाळेतील मुले आजी - आजोबा व नातेवाइकांशी मराठीत संवाद साधू शकतात. एक नवी भाषा शिकण्यामुळे त्यांचा मानसिक व बौद्धिक विकास होतो. मराठी शाळेतून उत्तीर्ण झालेली मुले शाळेत मदतनीस म्हणून काम करू शकतात.

शाळेचे शैक्षणिक वर्ष जरी सप्टेंबर महिन्यात सुरु होत असले तरी शाळेत प्रवेश कधीही घेता येतो. मराठी शाळेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा शाळेत आपल्या पाल्यासाठी नावनोंदणीसाठी किंवा कोणत्याही प्रकारे मदत करू इच्छित असल्यास (उदा. महिन्यातून एकदा मराठी शाळेत येऊन मुलांना गाणी शिकवणे / गप्पा मारणे)  

संपर्कासाठी माहिती खालील प्रमाणे:

स्थळ: 
Greenbank Middle School, 168 Greenbank Rd, Ottawa, K2H 5V2

वेळ
दर शनिवारी ९:३० - १२ (सप्टेंबर ते जून )

वयोमर्यादा
४ - १३ वर्ष (
JK - Grade 8)

नोंदणी शुल्क: 
१० $ (वार्षिक)

संपर्क:

उज्ज्वला कुलकर्णी 
Phone :  613-440-2177 
सुमेधा जोगळेकर  
Phone :  613-843-9351 

Ottawa Marathi School was a dream project of Kunda Mukhedkar that began in the year 2000 when she approached the Ottawa Carleton District School Board (OCDSB) to start Marathi Language Programme under the International Languages Programme (ILP). With the help of members of Marathi community the programme was successfully started. The key motivation behind starting Marathi school was to provide children from Marathi families with the opportunity to learn their mother-tongue and culture. Ujwala Kulkarni who shared Kunda's vision joined the School in 2005 and is the current Marathi teacher, supported by Sumedha Jogalekar as the supply teacher. 

Marathi School is a structured programme comprising of Basic, Intermediate and Advance levels. Since it is a multi-level (JK to Grade 8) programme personal attention is given to each student depending upon his/her level. Focus is on speaking (Shuddha Uchhar), reading (Akshar-Olakh/Vaachan), writing (Shudha Lekhan), listening and cultural awareness and development (festivals & celebrations) of the student. Students also get to do creative projects including Crafts, Recitations, Dance, Drama, Presentations, Alphabet songs, traditional Food, Games and Fun projects. The school’s annual program provides a platform to showcase their skills.

This programme benefits the students to communicate and interact other marathi kids in Ottawa as well as with their grand parents and relatives in India.  Learning an additional language helps with the cognitive development in children. Several students have graduated from the programme until now. Graduates of the school can avail the opportunity to collect volunteer hours by helping in the Marathi class on Saturday mornings. 

Although the recommended entry for the School is in September, registrations are accepted throughout the year. If you want to learn more about the Marathi School or enrol your child in the school or wish to help out in any way ( e.g. coming to Marathi school once a month to share story/ teach a skill or just chat with the kids) the details are below:

Information on Marathi School

Where: Greenbank Middle School, 168 Greenbank Rd, Ottawa, K2H 5V2

When: Saturdays from 9:30am -12:00 pm (September to June)

Who: Children in age group 4 to 13 years (JK-Grade 8) 

Cost: Free except the Registration fee of $10.

Contact: 

Ujwala Kulkarni
Phone : 613-440-2177 
Sumedha Jogalekar
Phone : 613-843-9351